Home > News Update > आदिवासी गोंड गोवारी समाजाचे नागपूरात १२ व्या दिवशी आंदोलन सुरुच

आदिवासी गोंड गोवारी समाजाचे नागपूरात १२ व्या दिवशी आंदोलन सुरुच

आदिवासी गोंड गोवारी समाजाचे नागपूरात १२ व्या दिवशी आंदोलन सुरुच
X

नागपूर : नागपूरातील संविधान चौकात आदिवासी गोंड गोवारी आंदोलकांचे आमरण उपोषम सरूच आहे. आज या आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. येत्या १० फेब्रुवारीला राज्य सरकारसोबत यासंदर्भात बैठक सुध्दा होणार आहे मात्र या बैठकीमध्ये जर तोडगा निघाला नाही तर या गोंड गोवारी आंदोलकांच्या वतीने १० लाख लोकसंख्येच्या वर असलेल्या जनतेसह संपूर्ण विदर्भपट्ट्यात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे.

समाजाला एस.टी प्रवर्गाचे लाभ मिळावेत यासाठी आणि त्याचबरोबर अनुसूचित जातीचे हक्क प्रदान करण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे.

Updated : 6 Feb 2024 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top