Home > News Update > आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा, काय घडलं दिवसभरात…

आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा, काय घडलं दिवसभरात…

आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा, काय घडलं दिवसभरात…
X

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवस दिल्ली दौ-यावर आहेत. आज दुपारी आदित्य ठाकरे दिल्लीत पोहचले त्यानंतर त्यांनी मुंबईतल्या काही प्रश्नांवर रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

मुंबईची रेल्वे, बेस्टचं डिजीटल कार्ड, डिलाईरोडचा रेल्वे ब्रिज आणि धारावीच्या प्रश्नांवर जवळपास ४० मिनिटं रेल्वे मंत्र्यांसोबत आदित्य ठाकरेंची बैठक पार पडली त्यानंतर महाराष्ट्र सदनाची पाहणी केली.

गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या खासदारांनी महाराष्ट्र सदनाबाबत तक्रारी केल्या होत्या.यासंदर्भात आढावा घेतला. महाराष्ट्र सदनात जास्तीत जास्त कार्यक्रम आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कसा फायदा घेतला येईल याबाबत चर्चा केली. उद्या दिवसभर रायसिना डायलॅाग या चर्चासत्रात आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. रायसिना डायलॅाग या कार्यक्रमात देशभरातले राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक पर्यावरणतज्ज्ञ असे विविध क्षेत्रातले लोक सहभागी होणार आहेत. उद्या दुपारी १.३० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता असं दोन सत्रात आदित्य ठाकरेची भाषण होणार आहेत.

Updated : 26 April 2022 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top