कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा तातडीने मंजूर करा: आदिती तटकरे यांची राजेश टोपेंना विनंती

17

अलिबाग, रायगड: रायगड जिल्ह्यातील नागरिकांची वेळेत आरोग्य तपासणी होऊन जिल्ह्यातील सर्व स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हास्तरावरच वेळेत मिळण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर व्हावी, असे विनंती पत्र पालकमंत्री आदिती सुनील तटकरे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांना दिले आहे.

या पार्श्वभूमीवर लवकरच रायगडकरांसाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा उभी केली जावून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Comments