Home > News Update > NDTV वर अदानींचा कब्जा, राजीनाम्याच्या चर्चेवर रवीशकुमार यांचे उत्तर

NDTV वर अदानींचा कब्जा, राजीनाम्याच्या चर्चेवर रवीशकुमार यांचे उत्तर

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी गृप मीडिया कंपनीने NDTV मधील 29.18 टक्के शेअर्सवर कब्जा केला आहे. याबाबत एनडीटीव्हीचे प्रमोटर्स प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

NDTV वर अदानींचा कब्जा, राजीनाम्याच्या चर्चेवर रवीशकुमार यांचे उत्तर
X

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी गृप मीडिया या कंपनीने न्यू दिल्ली टेलिव्हिजन या समुहातील 29.18 टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अदानी गृपची मीडिया कंपनी असलेल्या एएमजीने 26 टक्के भागीदारीची खुली ऑफरही देण्यात आली आहे. तर यासंदर्भात AMG लिमिटेड कंपनी हा करार करणार आहे. मात्र यावर प्रतिक्रीया देतांना एनडीटीव्हीचे प्रमोटर्स राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना, माहिती, नोटीस न देता अदानी गृपकडून घोषणा करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची पत्रकारितेशी तडतोड करणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड ही गौतम अदानी यांच्या अदानी समुहाची ही कंपनी आहे. तसेच एएमएएल ही अदानी यांच्या मालकीची एक उपकंपनी आहे. या एएमएएल ही कंपनी एनडीटीव्हीमधील 29.18 टक्के भागीदारी अप्रत्यक्षपणे खरेदी करणार आहे.



रविश कुमार राजीनामा देणार का?

रविश कुमार यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, माननीय जनता, माझ्या राजीनाम्याची चर्चा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मुलाखत अफवेसारखी अफवा आहे. तसेच अक्षय कुमार बंबईया आंबा घेऊन गेटवर माझी वाट पाहत आहे. त्यामुळे तुमचा रवीश कुमार जगातील पहिला आणि सगळ्यात महाग शुन्य टीआरपी असलेला निवेदक आहे, असं म्हणत राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळून लावले.



Updated : 6 Sep 2022 11:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top