Home > News Update > अदानी समुह टाकणार माध्यमं क्षेत्रात पाऊल, संजय पुगलिया यांच्यावर मोठी जबाबदारी

अदानी समुह टाकणार माध्यमं क्षेत्रात पाऊल, संजय पुगलिया यांच्यावर मोठी जबाबदारी

अदानी समुह टाकणार माध्यमं क्षेत्रात पाऊल, संजय पुगलिया यांच्यावर मोठी जबाबदारी
X

विविध उद्योग क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारा अदानी समुह आता माध्यमं क्षेत्रात पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्ट ची पूर्ण जबाबदारी संजय पुगलिया यांच्यावर टाकण्यात आली आहे. ते या प्रोजेक्टचे सीईओ आणि एडिटर-इन-चीफ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

अदानी ग्रृप मध्ये सहभागी होण्यापुर्वी संजय पुगलिया 'क्विंट डिजिटल मीडिया' (Quint Digital Media Ltd) मध्ये कार्यरत होते. 'क्विंट' जॉइन करण्यापुर्वी त्यांनी 'सीएनबीसी आवाज' (CNBC Awaaz) मध्ये देखील काम केले आहे.

कोण आहेत संजय पुगलिया? Who is Sanjay Pugalia

संजय पुगलिया यांना मीडिया क्षेत्रात काम करण्याचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी प्रिन्ट मीडिया तसेच टीव्ही पत्रकारितेत काम केले आहे. या अगोदर त्यांनी 'द टाइम्स ग्रुप', 'बिझनेस स्टँडर्ड', 'आजतक', 'झी न्यूज', 'स्टार न्यूज' आणि 'सीएनबीसी आवाज'मध्ये आपली जबाबदारी पार पाडली आहे.

दरम्यान संजय पुगलिया यांची अदानी समूहाच्या या नव्या प्रोजेक्टसाठी नियुक्ती झाल्यानं आता अदानी समून कोणतं चॅनल सुरु करणार अशी चर्चा सुरु असताना अदानी समुह दिल्लीतलं एक जुनं चॅनेल टेकओव्हर करणार अशी चर्चा आहे. पण ते चॅनल नेमकं कुठलं आहे. हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही.

Updated : 20 Sep 2021 10:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top