Home > News Update > अभिनेत्री रिचा चड्डाचे ट्वीट आणि गोदी मीडियाचा करंटेपणा

अभिनेत्री रिचा चड्डाचे ट्वीट आणि गोदी मीडियाचा करंटेपणा

अभिनेत्री रिचा चड्डाने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटनंतर गोदी मीडियाचा करंटेपणा समोर आला आहे.

अभिनेत्री रिचा चड्डाचे ट्वीट आणि गोदी मीडियाचा करंटेपणा
X

अभिनेत्री रिचा चड्डाने बाबा बनारस यांचे ट्वीट कोट केले आहे. ज्यामध्ये बाबा बनारस या ट्विटर अकाऊंटवरून सरकारने सांगितल्यास पाकव्याप्त काश्मीर परत आणू, असं लष्करी अधिकारी बोलल्याचे ट्वीट केले होते. त्याला कोट करून रिचा चड्डाने Galwan says hi असं ट्वीट केलं. त्यावरून सोशल मीडियावर रिचा चड्डाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं आहे. यानंतर रिचा चड्डाने ट्वीट डिलीट केले. मात्र यानंतर मुख्य प्रवाहातील माध्यमांचा करंटेपणा समोर आला आहे.

रिचा चड्डा यांनी केलेल्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले. मात्र ही ट्रोलिंग फक्त सोशल मीडियापुरतीच मर्यादित न राहता मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्येही पहायला मिळाली. इंडिया टुडेचे अँकर शिव अरुर यांनी टॉप 20 न्यूज या कार्यक्रमात रिचा चड्डा यांच्या ट्वीटची बातमी दाखवण्यात आली. यामध्ये रिचा चड्डाचे वक्तव्य असंवेदनशील असल्याचे म्हटले. मात्र या बातमीमध्ये वापरण्यात आलेल्या दृष्यात रिचा चड्डाचे सेमीन्युड फोटो वापण्यात आले आहेत.

इंडिया टुडेच्या बातमीत रिचा चड्डा यांच्या विविध चित्रपटांतील जे सेमीन्युड आणि बिकीनीतील फोटो वापरले आहेत. त्यामुळे रिचा चड्डा यांचे इतर फोटो असताना इंडिया टुडेने आवर्जुन बिकीनीतील सेमीन्यूड फोटो या बातमीत का वापरले? या फोटोंच्या माध्यमातून इंडिया टुडेला नेमकं काय सांगायचं आहे? गोदी मीडिया सरकारविरोधात बोलणाऱ्या अभिनेत्रींना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

रोफी गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, रिचा चड्डा यांच्या एक्सक्लुझिव्ह गलवान स्टोरीसाठी शिव अरुर यांनी बिकीनीतील फोटो वापरण्याला प्राधान्य का दिले आहे? आज तकने हेमा मालिनी, स्मृती इराणी यांची बातमी कव्हर करताना असे फोटो वापरले जात आहेत का? जर तुम्हाला अरुर कोण आहे माहिती असेल तर तो रिचा चड्डा यांचे बिकीनीतील फोटो वापरण्यामागची भुमिका लक्षात येईल, असं म्हणत गोदी मीडियावर सडकून टीका केली आहे.


पुन्हा एकदा मीडियाचा करंटेपणा

यापुर्वीही अनेकदा मोदी सरकारविरोधात बोलणाऱ्यांची बदनामी गोदी मीडियाकडून सुरु होती. त्यातच महिला अभिनेत्री असलेल्या रिचा चड्डा यांनी केलेल्या ट्वीटनंतर बिकीनीतील फोटो वापरुन इंडिया टुडेने करंटेपणा केला आहे.

रिचा चड्डा यांनी केलेले ट्वीट असंवेदनशील असेल तर महिला अभिनेत्री असलेल्या रिचा चड्डा यांचे बिकीनीतील सेमीन्युड फोटो वापरून तिची बदनामी करणे ही संवेदनशीलता आहे का?


एखाद्या विरुध्द विचारसरणीच्या व्यक्तीने मत व्यक्त केले तर त्याला वैचारिक विरोध करायला हवा. वैचारिक मुद्द्यांवरून टीका करायला हवी. मात्र इंडिया टुडेने रिचा चड्डा यांचे बिकीनीतील फोटो वापरून वैचारिक दिवाळखोरी सिध्द केली आहे. त्यामुळे हा गोदी मीडियाचा करंटेपणा असल्याचे समोर आले आहे.

Updated : 28 Nov 2022 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top