News Update
Home > News Update > अभिनेत्री नुसरत भरूचाला चित्रीकरणा दरम्यान अॅटॅक

अभिनेत्री नुसरत भरूचाला चित्रीकरणा दरम्यान अॅटॅक

अभिनेत्री नुसरत भरूचाला चित्रीकरणादरम्यान व्हर्टिगो अॅटॅक आला आहे. नुसरतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, चित्रपटाचे शुटींग थांबवण्यात आलं आहे.

अभिनेत्री नुसरत भरूचाला चित्रीकरणा दरम्यान अॅटॅक
X

अभिनेत्री नुसरत भरूचाला चित्रीकरणादरम्यान व्हर्टिगो अॅटॅक आला आहे. नुसरत एका शुटींगमध्ये असतांना अचानक सेटवर कोसळली. त्यानंतर नुसरतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

'लव रंजन' या चित्रपटाचं शूटिंग सुरू असतांना हा प्रकार समोर आला आहे. नुसरतची प्रकृती बिघडल्याने तातडीने चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं. नुसरतवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जास्त तणावामुळे नुसरतला व्हर्टिगो अॅटॅक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

'लव रंजन' चित्रपटाच्या चित्रकरणाबाबत नुसरत किंवा चित्रपटाच्या टीमने अधिकृत घोषणा केली नव्हती. दरम्यान सध्या नुसरतची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून पुढील काही दिवस तिला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

याआधी नुसरत 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्विटी' या चित्रपटांमध्ये झळकली होती. अतिशय कमी वेळात तिनं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुसरत अक्षय कुमार सोबत 'रामसेतु' या चित्रपटात देखील काम करत आहे.

तिच्या प्रकृतीबाबत तिच्या चाहत्यांना समजताच तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिल्या आहे आणि तिच्यासाठी प्रार्थना केली आहे.

Updated : 8 Aug 2021 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top