Home > News Update > अभिनेता अंशुमन मल्होत्राचे सुधागड किल्ल्यावर आक्षेपार्ह कृत्य, कारवाईची मागणी....

अभिनेता अंशुमन मल्होत्राचे सुधागड किल्ल्यावर आक्षेपार्ह कृत्य, कारवाईची मागणी....

अभिनेता अंशुमन मल्होत्राचे सुधागड किल्ल्यावर आक्षेपार्ह कृत्य, कारवाईची मागणी....
X

कोरोनाचे निर्बंध असतानाही अभिनेता अंशुमन मल्होत्रा याने सर्व निर्बंध तोडत सुधागड किल्ल्यावर वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नाहीतर इथे त्याने आपल्या मैत्रिणीसोबतचे आक्षेपार्ह्य स्थितीमधील फोटो सोशल मीडियावर अपलोडही केले. याला बा रायगड संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पोलीस आणि वनविभागाने यावर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी अंशुमन मल्होत्रा त्याच्या मित्र मैत्रिणीसोबत किल्ले सुधागडवर आला होता. पण तिथे त्याने गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. आपल्या मैत्रिणी सोबतचे आक्षेपार्ह फोटो त्याने आपल्या Instagram व youtube अकाऊंटवर अपलोड केले. त्यानंतर स्थानिकांनी याला आक्षेप घेतला आहे.


"स्वराज्यासाठी ज्या किल्ल्यांवर आमच्या बापजाद्यांनी रक्त सांडलं, स्वराज्य उभारण्यासाठी रक्ताचा अभिषेक घातला. तेथे जर अशा घटना घडत असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई व्हावी अशी मागणी 'बा रायगड परिवार' या संस्थेने तहसिलदार व पाली पोलिसांकडे केली आहे. हे क्षेत्र अभयारण्य घोषित केले असल्याने वनविभागाने किल्ल्यावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. तरीही हे लोक किल्ल्यावर कसे आले असा सवालही उपस्थित होत आहे.

Updated : 11 July 2021 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top