Home > News Update > वसुली बहाद्दरांवर कारवाई करणार- संजय रायमुलकर

वसुली बहाद्दरांवर कारवाई करणार- संजय रायमुलकर

वसुली बहाद्दरांवर कारवाई करणार- संजय रायमुलकर
X

नांदेड : नांदेड येथे पंचायत राज समिती आली आहे, त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे अशी चर्चा सुरू आहे. याबाबत पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही बाब माझ्या कानावर देखील आली आहे. मी माहिती घेऊन असा प्रकार घडत असेल तर दोषींना माफ करणार नाही. मी कारवाई करेन व आज बऱ्याच संघटना व सामान्य नागरिकांच्यावतीने तक्रारीचे निवेदन देखील मिळाले आहे. त्या निवेदनाच्या आधारे आम्ही माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाहीत असे देखील रायमुलकर म्हणाले.

पंचायत राज समिती तीन दिवशीय पाहणी दौऱ्यावर आहे. या समितीत विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान विविध विकास कामांचा आढावा घेतला जात आहे. सोबतच जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मात्र अशावेळी अधिकाऱ्यांकडून वसुलीचे टार्गेट दिल्याच्या चर्चा सुरू झाल्याने पंचायत राज समितीने याची गंभीर दखल घेतली आहे.

Updated : 3 Sep 2021 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top