Home > News Update > AC Local Train मध्ये फुकट्यांचा सुळसुळाट

AC Local Train मध्ये फुकट्यांचा सुळसुळाट

मुंबईत प्रत्येकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतो. मुंबईकरांची लाइफ लाईल म्हणजे लोकल रेल्वेचा (Local Train) प्रवास धावपळीच्या दुनियेत आपल्या ध्येया पोहचवत असते. या लोकल रेल्वेने अनेक जण तिकीट, पास काढून प्रवास करतात तर काही जण हे फुकट प्रवास करत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनला आणि प्रामाणिक प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

AC Local Train मध्ये फुकट्यांचा सुळसुळाट
X

साधारणपणे सेकंड क्लासमध्ये सर्वाधिक फुकटे सापडतात. तर कधी फर्स्ट क्लासमध्येही फुकटे सापडतात. यासर्वांपासून सुटका व्हावी आणि पैसे मोजून गारेगार प्रवास करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनानं मुंबई लोकलच्या मोजक्याच गाड्यांमध्ये एसीची सुविधा सुरू केली आहे. मात्र, फुकट्या प्रवाशांना सेकंड क्लास काय आणि फर्स्ट क्लास काय किंवा एसी काय? या सर्व गोष्टींचा फुकट्या प्रवाशांवर काहीच फरक पडत नाही.

मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते. देश विदेशातून तसेच अनेक राज्यातून नोकरीच्या (Job) शोधात अनेक जण मुंबईमध्ये येतात. नोकरी मिळाल्यानंतर मुंबईमध्ये राहणे सर्वांच्या खिशाला परवडत नाही, त्यामुळे मुंबईलगत असणाऱ्या उपनगरांमध्ये ते घरं घेऊन राहतात.

मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे प्रशासनानं सुरू केलेल्या एसी लोकलमधून दररोज साधाणतः ५० ते ७० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, आता या एसी लोकलमध्येही गर्दी वाढू लागलीय. नियमाप्रमाणे एसी लोकल ट्रेनचा पास काढणा-या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजूनही अशा फुकट्या प्रवाशांमुळं नाहक त्रास सहन करावा लागतोय.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळं एसी लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या वाढलीय. त्यामुळं साहजिकच सेकंड क्लासचं तिकिट काढून एसी लोकलमधून प्रवास करणा-यांचीही संख्या वाढलीय. त्यांच्या जोडीला फुकटेही एसी ट्रेनमधून प्रवास करत असल्यानं नियमाप्रमाणे एसी ट्रेनचं तिकिट किंवा पास काढलेल्या प्रवाशांना त्रास होतोय. एसी ट्रेनमधून नियमित प्रवास करणा-या काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर १९ मे २०२३ पासून रेल्वेनं कारवाईला सुरूवात केलीय. या कारवाईत १६ तिकिट तपासणीकांनी तब्बल ७९८ फुकट्यांविरोधात कारवाई केलीय.

Updated : 26 May 2023 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top