Home > News Update > मुंबई गुन्हे शाखेकडून गायब स्वदिच्छा मनीषा साने मुलीचा तपास करणार: गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई गुन्हे शाखेकडून गायब स्वदिच्छा मनीषा साने मुलीचा तपास करणार: गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई गुन्हे शाखेकडून गायब स्वदिच्छा मनीषा साने मुलीचा तपास करणार: गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधान परिषदेत घोषणा
X

शक्ति कायद्याने राज्यातील महिला अत्याचार रोखण्याचा संकल्प महा विकास आघाडीने केला असला तरी गायब होणाऱ्या महिला आणि मुलींच्या प्रश्नावर विधान परिषदेत खडाजंगी चर्चा झाली. आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर महिनाभरापूर्वी मुंबई समुद्र किनाऱ्यावरून गायब झालेल्या स्वदिच्छा मनीषा सानेचा तपास मुंबई गुन्हे शाखेतून केला जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विधान परिषदेत केली.

बोईसर येथे एमबीबीएस शिकणारी विद्यार्थिनी स्वदिच्छा साने बांद्रा बँड स्टँड वरून दिवसाढवळ्या दिनांक 29 नोव्हेंबर 2019 रोजी गायब झाली होती. याबाबत सखोल तपास तपासाची मागणी आमदार कायंदे यांनी केली होती. महिला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई शहर आणि राज्यांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असून सीसीटीव्ही मार्फत डेकोरेट तसेच महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके कार्यरत असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी उत्तरात दिली.

एक महिना उलटूनही तपास लागत नाही याबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत खंत व्यक्त केली. त्यावर मंत्री पाटील यांनी सदर तपास मुंबई गुन्हे शाखेकडून केला जाईल असे जाहीर केले. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालय एका गरीब विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिलं.

Updated : 23 Dec 2021 6:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top