Home > News Update > राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ५० जणांचा मृत्यू
X

राज्यात सलग तीन दिवस कोरोनाचे १५ हजारांच्यावर रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ८ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू द २.२८% एवढा झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक रुग्ण नागपूरविभागामध्ये आढळून आले आहेत. इथे दिवसभरात २८६२ रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबुईत १९६३ रुग्ण आढळले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात २१६ रुग्ण आढळले आहेत तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ४१७ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये ३२९, जळगावमध्ये ३३७, पुण्यात ६७३ रुग्ण आढळले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ६०८, औरंगाबादमध्ये मनपासह ९०३ रुग्ण आढळले आहेत.



Updated : 14 March 2021 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top