Home > News Update > राज्यात सलग चौथ्या दिवशी १५ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ४८ जणांचा मृत्यू

राज्यात सलग चौथ्या दिवशी १५ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ४८ जणांचा मृत्यू

राज्यात सलग चौथ्या दिवशी १५ हजारांच्या वर कोरोना रुग्ण, ४८ जणांचा मृत्यू
X

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा राज्याभोवती आवळत असून राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १५ हजार ५१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात सलग चार दिवस कोरोनाचे १५ हजारांच्यावर रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात १० हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू द २.२७% एवढा झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक रुग्ण नागपूर विभागामध्ये आढळून आले आहेत. इथे दिवसभरात ३०६७ रुग्ण आढळले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत १७१३ रुग्ण आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात ३०९ रुग्ण आढळले आहेत तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेत २५० रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये ३३२, जळगावमध्ये ४३३, पुण्यात ३६३ रुग्ण आढळले असून एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. अहमदनगर ३५९, पिंपरी चिंचवडमध्ये ६९८, औरंगाबादमध्ये मनपासह ११४४ रुग्ण आढळले आहेत.




Updated : 15 March 2021 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top