राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे तब्बल १५ हजार ८१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
तर २४ तासात ११ हजार ३४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख १७ हजार ७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७९% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या २.३१ % एवढा आहे. राज्यात सध्या एकूण १ लाख १० हजार ४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
सर्वाधिक रुग्ण पुण्यात
राज्यातील पुणे, नागपूर आणि मुंबई या शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढ गेल्या २४ तासात झाली आहे. नागपूर शहरात १७२९ रुग्ण आढळले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १८५४ रुग्ण आढळले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत १६४७ रुग्ण आढळले असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Updated : 12 March 2021 2:44 PM GMT
Next Story