Home > News Update > वंचित आघाडीकडून सुभाष खेमसिंग पवार यांचा पत्ता कट ; 'या' उमेदवाराच्या नावाची घोषणा

वंचित आघाडीकडून सुभाष खेमसिंग पवार यांचा पत्ता कट ; 'या' उमेदवाराच्या नावाची घोषणा

वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा उमेदवार सुभाष पवार यांचा पत्ता कट करत नवा उमेदवार देण्यात आला आहे.

वंचित आघाडीकडून सुभाष खेमसिंग पवार यांचा पत्ता कट ; या उमेदवाराच्या नावाची घोषणा
X

वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. हि उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केली होती. परंतू वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी या मतदार संघात उमेदवार बदलला आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी सोशल मिडीया एक्स पोस्ट X वरुन माहिती देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडी सोशल मिडीया वरुन एक्स पोस्ट X करण्यात आली. त्यामध्ये म्हटलं की "वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून होणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुभाष खेमसिंग पवार यांच्या जागी अभिजित लक्ष्मणराव राठोडे यांची उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ-वाशिम लोकसभा उमेदवार सुभाष पवार यांचा पत्ता कट करत अभिजित लक्ष्मणराव राठोडे यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. परंतू हा निर्णय वंचित आघाडीकडून का घेण्यात आला अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Updated : 4 April 2024 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top