Home > News Update > आप्पापाड्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : मुख्यमंत्र्याकडून भेटण्यास नकार...

आप्पापाड्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : मुख्यमंत्र्याकडून भेटण्यास नकार...

मुंबईतील आप्पा पाड्यात लागलेल्या आगीमुळे त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यातच या नागरिकांनी एकनाथ शिंदे यांना साद घातली.

आप्पापाड्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : मुख्यमंत्र्याकडून भेटण्यास नकार...
X

मुंबईतील (Mumbai) अप्पा पाडा येथे लागलेल्या आगीमुळे (fire) अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आक्रोश करत वर्षावर धाव घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नसल्याची खंत अप्पा पाड्यातील (Appa pada) नागरिकांनी व्यक्त केली. मुंबईतील अप्पा पाडा, मालाड पूर्व (Malad East), आनंद नगर (Anand Nagar) झोपडपट्टीत भीषण आग लागली. 13 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास या आगीने रौद्र रूप धारण केले.

आगीचे स्वरूप इतके भयंकर होते की या आगीमुळे 2000 हून अधिक संसार उद्ध्वस्त झाले. गेल्या दोन दिवसापासून अप्पा पाडा येथील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वर्षा बंगल्यावर धाव मुख्यमंत्र्यांना साद घातली. यावेळी बोलताना अप्पा पाड्यातील सुशांत याने बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री आमच्याकडे येऊ शकत नसतील, त्यांना वेळ नसेल, तर आम्ही आमच्या मागण्या घेऊन त्यांच्याकडे जातो. पण यावेळी वर्षावर येऊनही मुख्यमंत्र्यांची भेट झाली नसल्याचे चित्र आहे.

काय आहेत अप्पा पाड्यातील नागरिकांच्या मागण्या?

1) ज्या कुटुंबाचे घर जळाले. त्यांना त्यांचा संसार पुन्हा उभारण्यासाठी रुपये 1 लाख तात्काळ अर्थ सहाय्य करावे.

2) मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये रक्कम मिळावी.

3) जळीत कुटुंबाचे जे काही शासकीय दस्त आहेत ते मिळवून देण्याची व्यवस्था करावी.

4) ज्यांची घरे जळाली आहेत त्यांची तातडीने व्यवस्था करावी.

5) ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा मुकली आहे, त्या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देण्यास मान्यता द्यावी.

6) ज्या कुटुंबियांनी वन विभागाकडे 7 हजार रुपयांचा भरणा भरला आहे. त्यांच्या पावत्या जळून गेल्या आहेत. त्यांच्या नोंदणी प्रमाणे त्या पावत्या परत मिळाव्यात.

7) गेल्या 15 वर्षापासून वंचित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा. म्हणजे एक तर स्थलांतर करून द्यावे किंवा आहे त्या जागेवर पक्के घर बांधून द्यावे. मात्र एक घर प्रत्येकाला मिळावे.

8) जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत नागरिकांना अन्न, पाणी, शौचालय आदी मूलभूत गरजा उपलब्ध करून द्याव्यात.

या मागण्या घेऊन अप्पा पाड्यातील नागरिक वर्षावर पोहचले. मात्र तिथे 4 सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या PA ने ऐकल्या आणि भेटण्यापूर्वी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. साहेबांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि उद्या या, असं सांगून त्यांना बाहेर काढलं. त्यामुळे जळीत अप्पा पाड्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय परत फिरावे लागले.

Updated : 16 March 2023 4:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top