Home > News Update > तुर्की राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर आमीर खान वादात

तुर्की राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर आमीर खान वादात

तुर्की राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर आमीर खान वादात
X

अभिनेता आमीर खान (Aamirkhan) याने नुकतीच तुर्कस्थानच्या राष्ट्रपती एर्देगॉन (turkey president Erdoğan) यांच्या पत्नीची भेट घेतली. पण यावरुन आता सोशल मीडियावर आमीर खानला ट्रोल केले जात आहे. भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या आणि भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या एर्देगॉन यांच्या पत्नीला भेटण्याची आमीर खानला काय गरज होती, अशा आशयाचे प्रश्न काहींनी सोशल मीडियावर उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा...

फेसबुकने राजकीय धंदा बंद करावा, सामनामधून सल्ला

पुण्यात एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद

#BanonFacebook: फेसबूक वर बंदी घालावी का? : मुग्धा कर्णिक

भाजप – फेसबुक संबंध, फेसबुकचे स्पष्टीकरण

पण या नेटकऱ्यांना आमीर खानच्या फॅन्सनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi )जर नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना भेटू शकतात तर मग आमीर खान तर कोणत्याही पदावर नाहीये, मग तो कुणालाही भेटला तर काय फरक पडतो असा सवाल आमीर खानच्या फॅन्सनी उपस्थित केला आहे.

आमीर खानच्या एका चाहत्याने तर त्याचे आदिवासी पाड्यांमधील आणि ग्रामीण भागातील काम करतानाचे फोटो शेअर करत ही लोकं आमीर खानचे हे काम कधीच दाखवणार नाहीत अशी टीका केली आहे.

काहींनी तर आमीर खानचा लालसिंग चढ्ढा या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करु टाकले आहे. काही वर्षांपूर्वी आमीर खानने भारतात असुरक्षित वाटते असे वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान काँग्रेसचे (congress) नेते अभिषक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी तुर्कस्थानच्या भारतविरोधी भूमिकेवर ट्विटवरुन टीका केली होती. त्याचा संदर्भ आमीर खानशी जोडला गेला. पण सिंघवी यांनी स्पष्टीकरण देत, आपल्या ट्विटचा संबंध आमीर खानशी नाही, तो स्वतंत्र व्यक्ती आहे कुणालाही भेटू शकतो, त्याने दाऊद इब्राहिमची भेट घेतली असती तर विरोध करणे चुकीचे होते. पण मी तुर्कस्थानचा विरोध करत आहे” असे मत व्यक्त केले आहे.

तर भाजपने (bjp) आमीर खानवर जोरदार टीका केली आहे. “आमीर खान एक स्वतंत्र व्यक्ती आहे. पण देशाबाबत त्यांची काही जबाबदारी आहे की नाही, भारतीयांच्या प्रेमामुळे तो आमीर खान बनला आहे. काश्मीर प्रश्न असेल किंवा इतर मुद्द्यांवरही भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या एर्देगॉन यांच्या पत्नीला तो कसा भेटू शकतो?” असा सवाल भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी विचारला आहे.

Updated : 18 Aug 2020 8:06 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top