Home > News Update > महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार?

महाराष्ट्र राज्य वगळून इतर राज्यात महिलांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला. महाराष्ट्रात २०२४ नंतर निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महिला मुख्यमंत्री होईल का?

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार?
X

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी देखील महिलांशी संवाद साधत राजकारणात काय बद्दल होणे अपेक्षित आहे, याविषयांवर महिलांची मतं जाणून घेतली. काँग्रेस पक्ष पहिल्यापासूनच राजकारणात महिलांना आरक्षण मिळावे यासाठी लढत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या देखील पदयात्रेत सहभागी होत्या. पदयात्रेतील महिलांची वाढती गर्दी पाहून शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या "राजकारणात पहिल्यापासूनच नेत्यांची मुल येताना पाहिली आहेत. आता मंत्र्यांची मुली येतील. त्यामुळे आमच्यातला आत्मविश्वास जागा झाला आहे. राजकारणातील निवडणूकीत ३० टक्के आरक्षण महिलांना कायद्यानुसार मिळाले नाही. मुली राजकारणात येऊन कशा पद्धतीने आरक्षण मिळवता येईल, याचे सध्या नियोजन सुरु आहे. महाराष्ट्रातील पुढील २०२४ च्या निवडणूकीत काँग्रेसचे सरकार आले तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर महिला बसणार" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला मुख्यमंत्री कोण होणार?

महाराष्ट्र राज्य वगळता ईतर राज्यात वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, उमा भारती, शिला दीक्षीत, राबडा देवी, मुख्यमंत्री होताना या महिलांची नावे ऐकायाला मिळावी होती. परंतू महाराष्ट्रात अद्यापही मुख्यमंत्री पद महिलेला देण्यात आले नाही.

२०२४ च्या निवडणूकीत काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर महिला मुख्यमंत्री होणार असा विश्वास शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून व्यक्त केला आहे.

यापूर्वी देखील महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर महिला बसावी असं मत अनेक राजकीय व्यक्तींकडून केलं जात होतं. त्यातच राज्याच्या राजकारणात महिला मुख्यमंत्री होण्याविषयी चर्चा सुरू झाली तर सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होते. त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या यशोमती ठाकूर यांचेही नाव चर्चेत होते.



Updated : 19 Nov 2022 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top