Home > News Update > गार्डनच्या बांधकामाचा वाद, महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि ठेकेदाराची हाणामारी

गार्डनच्या बांधकामाचा वाद, महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि ठेकेदाराची हाणामारी

गार्डनच्या बांधकामाचा वाद, महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि ठेकेदाराची हाणामारी
X

उल्हासनगरमध्ये एका खासगी इमारतीमधील गार्डनच्या बांधकामाच्या वादातून हिराली फाउंडेशन अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी आणि ठेकेदार अजय शेवानी यांच्यात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांनीही एकमेकांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

खासगी इमारतीच्या जागेत महापालिकेच्या पैशाने गार्डन बांधण्याचा घाट का घातला जातोय, असा सवाल विचारत सरीता खानचंदानी यांनी विरोध केला. त्यानंतर इथले काम का सुरू केले असा जाब त्यांनी कंत्राटदाराला विचारला. त्यानंतर कंत्राटदाराने त्यांचा खाली पाडत मारहाण केल्याचा आरोप सरीता यांनी केला आहे. तर आपण अद्याप कुठल्याही गार्डनच काम सुरू केलं नसून आपल्य़ावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याचे स्पष्टीकरण ठेकेदार अजय शेवानी यांनी दिले आहे.

Updated : 29 Oct 2021 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top