Home > News Update > संग्राम देशमुख संचालक असलेल्या कारखान्यात घोटाळ्याचा आरोप, व्हायरल पत्रानंतर चौकशीची मागणी

संग्राम देशमुख संचालक असलेल्या कारखान्यात घोटाळ्याचा आरोप, व्हायरल पत्रानंतर चौकशीची मागणी

महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप कऱणाऱ्या भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

संग्राम देशमुख संचालक असलेल्या कारखान्यात घोटाळ्याचा आरोप, व्हायरल पत्रानंतर चौकशीची मागणी
X

साखर कारखान्यांमधून अनेक सम्राटांनी मोठ्या प्रमाणात 'साखर' खाल्ल्याचे आरोप नियमितपणे होत असतात. पण साखरेच्या नावाने कोट्यवधी रुपये उचलले गेल्याचा आरोप झाला तर? हो पण असा आरोप झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे रिंगणात उतलेल्या संग्राम देशमुख संचालक असलेल्या कारखान्याबाबत आरोप करणारे एक पत्र सध्या व्हायरल झाले आहे. या पत्रानुसार सांगली जिल्ह्यातील Cane Agro Raigaon आणि Green Power Sugar Gopuj या दोन साखर कारखान्यांच्या संदर्भात एक पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रानुसार या दोन्ही कारखान्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या साखरेच्या पोत्यांवर सांगली जिल्हा बँकेतून कर्ज उचलले आहे. पण यातील अनेक पोत्यांम्ध्ये साखर नसून बगॅस म्हणजे भुसा भरला असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.


व्हायरल पत्र कुणाचे?

मॅक्स महाराष्ट्राच्या टीमच्या हाती हे पत्र पडताच आम्ही या पत्राची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या टीमने संबंधित कारखान्याच्या साखर गोडाऊनला भेट दिली. या ठिकाणी गोडाऊन अस्तित्वात असल्याचं दिसून आलं. स्थानिकांशी या गोडाऊन संधर्भात चौकाशी केली असता, हे गोडाउन Green Power Sugar Gopuj चे असल्ये त्यांनी सांगितले. पण त्या पत्रात आरोप केल्याप्रमाणे त्या गोडाऊनमधील पोत्यांमध्ये साखर आहे की भुसा हे मात्र समजू शकलेले नाही.

यानंतर आमच्या टीमने पत्र पाठवणा-या व्यक्तीचा शोध घेतला तेव्हा मोहन यादव यांची भेट झाली. त्यांच्याकडून या पत्राबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, " हे पत्र आपण पाठवलेच नाहीये. मात्र, गोडाऊनमध्ये साखर आहे की भुस्सा अशा आशयाचं पत्र कोणी माझ्या नावाने व्हायरल केलं असेल तर या गोडाऊनमध्ये नक्की काय आहे याचा तपास होणं गरजेचं आहे, " असे त्यांनी सांगितले.

सांगली जिल्हा बँकेचे म्हणणे काय?

यानंतर आमच्या टीमने साखरेवर कर्ज देणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क केला साधला. त्यांनी याबाबत आपल्याला माहिती कळवू असं सांगितले. तसेच या गोडाऊनमध्ये नक्की काय आहे? याची पूर्ण माहिती संबंधित कंपनीकडे असल्याचे सांगितलं. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने या गोडाऊनची जबाबदारी नक्की कोणत्या कंपनीकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. National Bulk Handling Company कडे या गोडाऊनची जबाबदारी असल्याचं समजलं.

गोडाऊनवर नियंत्रण कुणाचे?

त्यानंतर मॅक्समहाराष्ट्रने या कंपनीचा शोध घेऊन संपर्क साधला असता, सदर कंपनीने आता हे गोडाऊन आपल्याकडे नसल्याचे सांगितले. दीड महिन्यापूर्वीच या गोडाऊन संदर्भातील करार संपल्याने आता आमची जबाबदारी संपली असल्याचं National Bulk Handling company तर्फे सांगण्यात आले.

यानंतर आम्ही या कारखान्याचे संचालक आणि संस्थापक संग्राम देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यास आम्ही या बातमीमध्ये अपडेट करू.

सहकारातून कुणाचा उद्धार?

या संदर्भात सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका नेत्याशी बातचीत केली असता, सदर नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मॅक्स महाराष्ट्राला प्रतिक्रिया देताना सांगितले की, "सांगली जिल्ह्यामधील सर्वच साखर कारखान्यांना साखरेवर कर्ज दिलं जातं. यासाठी साखर कारखान्यांना साखरेचा साठा बँकांकडे गहाण ठेवाला लागतो. यासाठी बँकांना दाखवण्यासाठी एखाद्या साखर कारखान्याकडे साखर साठा कमी पडल्यास जिल्ह्यातील साखर सम्राट एकमेकांचे पक्षीय भेद विसरून कर्ज घेण्यासाठी साखर पुरवतात. त्यामुळे सदर गोडाऊनमध्ये साखर आहे की भुसा हा हे जरी स्पष्ट नसले तरी बँकेच्या पैशांचा काय? तसंच तुम्ही यासंदर्भातली बातमी देताच त्या गोडाउनमध्ये साखर उपलब्ध नसेल तर साखर उपलब्ध होण्यास वेळ लागणार नाही. हे सहकार आहे आणि अशाच प्रकारे इथं सहकार चालतो. मात्र, बँकेने या गोडाऊनची चौकशी करणे गरजेचे आहे. पण बॅंक असे काही करण्याची हिंमत दाखवेल असं वाटत नाही." अशी प्रतिक्रिया सदर नेत्याने दिली.

राज्यात सहकार क्षेत्रात हजारो कोटींचे घोटाळे समोर येत असताना या गोडाtनमध्ये साखर आहे की भुसा हे सत्य समोर येणं गरजेचं आहे.

कोण आहेत संग्राम देशमुख

संग्राम देशमुखे हे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या सारख कारखान्याचे ते संचालक आहे. २०१९-२०२०मध्ये ऊसासाठी 2578 एफआरपी दिला तर ४ लाख ८२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रीन पॉवर शुगर गोपुज येथील साखर कारखान्याचे संस्थापक आहेत.

Updated : 28 Nov 2020 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top