Home > News Update > Viral : ठाकरे सरकारला शिवसैनिक एसटी कर्मचाऱ्याचे सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल

Viral : ठाकरे सरकारला शिवसैनिक एसटी कर्मचाऱ्याचे सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल

Viral : ठाकरे सरकारला शिवसैनिक एसटी कर्मचाऱ्याचे सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
X

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळाने आंदोलक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यास आणि निलंबित करण्यास सुरूवात केली आहे. पण आता या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संप सुरू असला तरी काही ठिकाणी शिवसेनेच्या एसटी कामगार संघटनेतील सदस्यांनी एसटी बस चालवण्यास सुरूवात केली आहे.

पण आता कमी पगार आणि इतर सुविधांमुळे या कर्मचाऱ्यांच्या मनातही संतापाची भावना निर्माण झाली आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्य़ा एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांना आपण शिवसैनिक आणि एसटी कामगार असल्याचे सांगत एका व्यक्तीने फोन करुन जाब विचारला असल्याचे या व्हिडिओ क्लीपवरुन दिसते आहे. मनसेशी संबंधित महाराष्ट्र धर्म या फेसबुक पेजवर ही ऑडिओ क्लीप प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लीपची सत्यता मॅक्स महाराष्ट्रने तपासलेली नाही.


Updated : 22 Nov 2021 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top