Home > News Update > तलवारी घेऊन अंगावर येणाऱ्या महाराजावर गावकऱ्यांचा हल्ला

तलवारी घेऊन अंगावर येणाऱ्या महाराजावर गावकऱ्यांचा हल्ला

तलवारी घेऊन अंगावर येणाऱ्या महाराजावर गावकऱ्यांचा हल्ला
X

औरंगाबाद: औरंगाबादच्या जिल्ह्यातील एका गावात मंदिरातील महाजारांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पैठण तालुक्यतील जांभळी गावाजवळील मेहरबान नाईक तांडा येथील राम मंदिरात ही घटना घडली आहे. गणेश गिरी महाराज यांना मारहाण करण्यात आली आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक गावकरी महाराजांवर चालून गेले होते. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाले असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये गणेश महाराज यांच्या हातात दोन तलवारी दिसत आहेत. मात्र ह्या तलवारी मी स्वतःच्या संरक्षणासाठी काढल्याचा दावा महाराजांनी केला. तर हे गावकरी मला नेहमी त्रास देतात आणि यापूर्वी सुद्धा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही महाराजांनी केला आहे.

गावकऱ्यांच्या म्हण्यानुसार शुक्रवारी मोक्षदा एकादशी असल्याने निलजगाव येथून दर्शनासाठी महिला व पुरूषांची दिंडी श्रीराम टेकडीवर गेली होती. दरम्यान, दिंडीतील महिला टेकडीवर फराळ करण्यासाठी बसल्या असता महाराजांच्या मालकीची एक गाय या महिलांमध्ये घुसली महिलांना त्रास होऊ नये म्हणून एका गावकऱ्याने तेथून गाय हुसकावून लावली. गायीला हुसकावून लावल्याचा महाराजांना राग आला त्यांनी गाय हुसकावणाऱ्या गावकऱ्यास दोन काठ्या मारल्या. याचा जाब विचारताच महाराज अरेरावी करत तलवार घेऊन धाऊन आल्याने गावकरी घाबरले व त्यांनी दगडफेक केली असे गावकरी सांगत आहेत.

Updated : 26 Dec 2020 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top