Home > News Update > पाचोऱ्यात तीन मजली इमारत कोसळली; सुदैवाने जीवीतहानी नाही

पाचोऱ्यात तीन मजली इमारत कोसळली; सुदैवाने जीवीतहानी नाही

पाचोऱ्यात तीन मजली इमारत कोसळली; सुदैवाने जीवीतहानी नाही
X

बांधकाम करतांना गेल्या पाच वर्षांपुर्वी काही तांत्रिक दोष राहील्याने शहरातील बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत कोसळली सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

शहरातील व्हीपी रोड वरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणुन तीन मजली इमारतचे सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधकाम केली होती. मात्र या इमारतीला पावसाने तडा पडला म्हणून येथे असलेले भाडेकरूंनी इमारत रिकामी केली होती. रिमझिम चालणाऱ्या पावसाने काल रात्री १० वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. यापूर्वी नगर परिषदने हा रस्ता बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. इमारत कोसळलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

Updated : 21 Sep 2021 12:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top