Home > News Update > "योगीजी पे भरोसा रखा मगर नही रहे बाबूजी…"

"योगीजी पे भरोसा रखा मगर नही रहे बाबूजी…"

उत्तर प्रदेशात अखेरच्या क्षणापर्यंत उपचारांसाठी मदत मागणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराचे निधन झाले आहे. पाहा योगी सरकारच्या व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारा हा प्रकार....

योगीजी पे भरोसा रखा मगर नही रहे बाबूजी…
X

एकीकीडे भाजपचे नेते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कोरोना काळातील कामाचा ढोल बडवत आहेत. तर दुसरीकडे एक ज्येष्ठ पत्रकाराने वारंवार मदतीची याचना करत राहिला पण त्यांच्यापर्यंत योगींची मदत पोहोचलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

उत्तर प्रदेश येथील ज्येष्ठ पत्रकार विनय श्रीवास्तव यांची तब्येत खालावली होती. ऑक्सीजन लेव्हल ५२ इतकी खाली आली तरीही त्यांना मदत मिळत नसल्याने त्यांनी @cmoyogiadityanath यांना ट्विट करून याबाबत मदत करण्याचे आवाहन केले. हे ट्विट त्यांनी १६ एप्रिल रोजी २ वाजून २ मिनिटांनी केले होते.



त्यांची तब्येत सतत खालावत गेली. या ट्विटवर त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे सल्लागार शालाभ मनी त्रिपाठी यांनी दुसऱ्या दिवशी २ वाजून २ मिनिटांनी ट्विट करत पूर्ण पत्ता मागितला.


यानंतर काही मिनिटांतच त्यांचा मुलगा तसेच विनय श्रीवास्तव यांनी स्वतः ट्विट करत संपूर्ण पत्ता दिला. त्यांची ऑक्सीजन लेवल ५६ असल्याचे तसेच रिपोर्ट दोन दिवसांनी येणार असल्याने मला आता काय करावे लागेल असे विचारले.




पत्ता पाठवल्यानंतर शालाभ त्रिपाठी यांनी ok असे ट्विट केले. यादरम्यान भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष दिल्लीच्या दिनेश कुमार यांनी भगवाधारी नावाच्या ट्विटर हँडेल वरून आदरणीय बाबूजी माननीय योगीजी पर विश्वास रखो आपकी पुरी मदत की जायेगी. असे ट्विट करून योगींवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.





यानंतर विनय श्रीवास्तव आणि त्यांचे कुटुंबीय मदतीची वाट पाहत राहिले. विनय श्रीवास्तव यांची तब्येत यानंतर खालावत गेली. त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. याच दरम्यान आरोग्य विभागाशी संपर्क केला असता फोन उचलला जात नाही अशी माहिती देखील ते देत होते.

त्यांची ऑक्सीजन लेव्हल ३ वाजून १५ मिनिटांनी आणखी खालावली. याची माहिती देखील त्यांनी ट्विट करून तसेच ऑक्सीमिटरचा फोटो ट्विट करून दिली. त्यांचे ऑक्सीजन लेवल ३१ वर आली तरीही त्यांना मदत मिळाली नाही.




त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आले. पण तेथील गार्ड आत येऊ देत नसल्याचे देखील त्यांनी ट्विट करून सांगितले.





६५ वर्ष वय असलेले वृद्ध पत्रकार विनय श्रीवास्तव अखेरपर्यंत जीव वाचवण्यासाठी योगी सरकारकडे मदत मागत गेले. त्यांचे ट्विट सरकारच्या व्यवस्थेपर्यंत पोहचले परंतु त्यांना सरकार कडून कोणतीही मदत करण्यात आली नाही. या दरम्यानच ४ वाजून २१ मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती ट्विटर वाटून त्यांच्या मुलाने दिली. यामध्ये ते योगी सरकार वर संताप व्यक्त करत म्हणतात papa is no more kaha gayi tumhari Ambulance साळू विनय श्रीवास्तव हे शेवटपर्यंत जगण्यासाठी धडपड करत राहिले. सरकार मदत करेल या आशेवर ते ट्विट करत राहीले. पण त्यांना मदत मिळाली नाही.

मृत्यू शय्येवर असताना ते मदत मागत होते पण योगी सरकारने त्याची दखल घेतली नाही. तर दुसरीकडे मारुती भगत या ट्विटर अकाऊंटवरुन या अवस्थेतही त्रिपाठी यांनी मत कोणाला दिले होते, असा अनाहूत सवाल विचारला, यावर नाराज होत त्याही अवस्थेत त्यांनी उत्तर दिले...

मैने देश को वोट दिया था ना किसी राजनेता को भगवान ना करे आपके किसी करिबी पे ये दिक्कत हो और आप ये सवाल पूछे





या घटनेनंतर अनेकांनी योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. श्रीवास्तव यांचा मृत्यू व्यवस्थेमुळे झाला असल्याचा रोष लोकांनी व्यक्त केला आहे.

Updated : 17 April 2021 2:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top