Home > News Update > 'गांधी कल आज और कल', स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अधोरेखित करण्यासाठी उपक्रम

'गांधी कल आज और कल', स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अधोरेखित करण्यासाठी उपक्रम

गांधी कल आज और कल, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अधोरेखित करण्यासाठी उपक्रम
X

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान येथे गांधी कल आज और कल चर्चासत्र आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते... यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून रचनात्मक लोकविस्तर समिती चे संस्थापक अध्यक्ष संदीप दिक्षित ,ज्येष्ठ शेतकरी नेते तथा पत्रकार 'गांधी मरत का नाही' पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखेडे उपस्थित होते.

यावेळी महात्मा गांधींनी तसेच देशातील थोर महापुरुषांबद्दल होत असलेला अपप्रचार तसेच त्यांच्याबद्दल समाजात असलेल्या चुकीची माहितीचा येणाऱ्या पिढ्यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशी भीती या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून येणाऱ्या पिढ्यांना अनभिज्ञ ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही करण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लोक विसरून जातील याचा प्रतिकार म्हणून समविचारी संघटनांनी लढा देणे गरजेचे आहे, त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Updated : 19 Dec 2021 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top