Home > News Update > Thane CM Eknath Shinde Rakhi : ठाण्यातील बाजारामध्ये 'मी शिंदे समर्थक' नावाच्या राखीची जोरदार चर्चा

Thane CM Eknath Shinde Rakhi : ठाण्यातील बाजारामध्ये 'मी शिंदे समर्थक' नावाच्या राखीची जोरदार चर्चा

Thane CM Eknath Shinde Rakhi : ठाण्यातील बाजारामध्ये मी शिंदे समर्थक नावाच्या राखीची जोरदार चर्चा
X

सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समर्थकांकडून विविध युक्त्या लढवल्या जातात. त्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मी एकनाथ शिंदे समर्थक नावाची राखी रक्षाबंधनानिमीत्त बाजारात आणली आहे. अशाच प्रकारची राखी गेल्या वर्षीसुद्धा बाजारात आणली होती. मात्र मी एकनाथ शिंदे समर्थक या राखीची जोरदार चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक हिताची कामे केली. त्यामुळंच त्यांचं फोटो असलेली राखी मोफत देण्याचा उपक्रम मामाची राखी ब्रॅण्डने याही वर्षी राबवला आहे. मात्र मी शिंदे समर्थक आणि पुढच्या वर्षी देखील शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असे जोरात बोलावे, अशी अट राखी विक्रेता विवेक गांगर यांनी ठेवली आहे. त्यांच्या ह्या उपक्रमाला ठाणेकरांकडून चांगलाच प्रतिसाद लाभल्याचे चित्र सुद्धा दिसत आहे.

Updated : 30 Aug 2023 1:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top