Home > News Update > मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याकडून नवमतदाराला शाई लावण्यास टाळले...!

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याकडून नवमतदाराला शाई लावण्यास टाळले...!

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्याकडून नवमतदाराला शाई लावण्यास टाळले...!
X

नागपूर : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी नागपूर शहरात पार पडले. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नविन मतदारांमध्ये या निवडणूक प्रक्रियेबद्दल कमालीची उत्सुकता होती. परंतु शहरातील एका मतदान केंद्रावर कर्मचाऱ्याने निवडणूकीच्या नियमांनाच धाब्यावर बसवत नवमतदाराला बोटाला शाहीला शाही लावण्याचे टाळले, यामुळे हे पाहून मतदाराची निवडणूकीबद्दल असलेली उत्सुकताच मावळली.

वर्षभरापूर्वीच नागपूर शहरांमध्ये वास्तव्यास आलेल्या स्वयम चव्हाण या तरुणाला पहिल्यांदाच नव्याने मतदान करण्याची संधी मिळाली, त्यामुळे निवडणूकीत पहिल्यांदाच मतदान करण्याची उत्सुकता त्याच्या मनात निर्माण झाली होती. तो उत्साहातच खामला परिसरात पीएम कॉन्व्हेंट येथे पोहोचला. मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते हे त्याने पहिल्यांदाच पाहिले. परंतु याबाबत ज्या गोष्टी त्याने ऐकल्या होत्या त्यापेक्षा काहीतरी वेगळंच त्याला अनुभवायला मिळालं त्यामुळे त्याचा भ्रमनिरास झाला. बोटाला शाई लावल्याशिवाय मतदाराला मतदान यंत्राकडे पाठवले जात नाही पण या केंद्रावर मात्र बोटावर शाही लावणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला, 'आधी मतदान कर मग शाही लावतो', असे सांगितले. स्वयम मतदान यंत्राकडे गेला तर ते बंद होते त्यानंतर थोड्याच वेळात ते सुरू करण्यात आले. त्यावेळी 'तू मतदान केले आहेस ना? मग कशाला हवी तुला शाही?' असं म्हणून त्याला परत पाठवले.

मतदान कक्षातून बाहेर आल्यानंतर स्वयम या तरुणाने सदरील घटनाप्रकार एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितला त्यानंतर पोलीस अधिकारी स्वयमला सदरील कर्मचाऱ्याकडे घेऊन गेला. पोलीस अधिकाऱ्याने याबाबत कर्मचाऱ्याला त्याची जबाबदारी असल्याबाबतची जाणीव करून दिली. त्यावेळी कर्मचाऱ्याने स्वयमला शाही लावली. अशा प्रकारांमुळे नवमतदार मतदानासाठी उत्साह दाखवतील का? असा यावेळी प्रश्न उपस्थित झाला आहे.

Updated : 20 April 2024 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top