Home > News Update > लखीमपूरमधील हिंसाचाराचा व्हिडीओ आला समोर, विरोधकांचा भाजपवर हल्ला

लखीमपूरमधील हिंसाचाराचा व्हिडीओ आला समोर, विरोधकांचा भाजपवर हल्ला

लखीमपूरमधील हिंसाचाराचा व्हिडीओ आला समोर, विरोधकांचा भाजपवर हल्ला
X

लखमीपूर खेरी येथील रविवारी घडलेल्या घटनेचा एक नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एक जीप शेतकऱ्यांना मागून चिरडताना

दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विट करत विरोधी नेत्यांनी भाजपवर तीव्र हल्ला केला आहे. काँग्रेस, आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह सर्व नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र याबाबत पोलीस किंवा संबंधित प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या व्हिडिओत दिसत आहे की मोठ्या संख्येने शेतकरी हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आंदोलन करत आहेत. दरम्यान, मागून येणाऱ्या जीपने अनेक शेतकऱ्यांना चिरडले. जीपच्या मागे एक एसयूव्ही देखील आली. भरधाव जीपने धडक दिल्याने अनेक शेतकरी जखमी झाले. एका वृद्धाला जीपला तर धडक दिल्यानंतर त्या शेतकऱ्याने बोनेटवर उडी मारली आणि नंतर जमिनीवर ते पडले. अचानक घडलेल्या घटनेने घटनास्थळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सर्वांनी जखमींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपवर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान, हा सर्व कट होता आणि या कटाची माहिती योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकार यांना होती, पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही एवढेच नाही तर केंद्रीय मंत्र्यांवर आणि त्यांच्या मुलावर देखील अजून कोणतीही कारवाई झालेली नाही अशी टीका देखील योगेंद्र यादव यांनी केली आहे.

Updated : 5 Oct 2021 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top