Home > मॅक्स रिपोर्ट > बस स्थानकात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार

बस स्थानकात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार

बस स्थानकात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ४०० जणांचा बलात्कार
X

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरणं समोर आले असून, पोलीस आता या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून, आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण.....

ही संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील आहे. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं वयाच्या १३ व्या ववर्षीच एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. पण पुढे लग्नानंतर नवरा सांभाळत नसल्याने आणि मारहाण करत असल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली. मात्र राक्षस बापाची मुलीवर नियत फिरली आणि तो तिला मारहाण करत शारीरिक संबध ठेवण्यासाठी बळजबरी करू लागला.त्यामुळे पिडीत मुलीने घर सोडून, बस स्थानकालाच आपला निवारा बनवल आणि असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. तेथच भिक मागून खाऊन ती दिवस काढत होती.

पण एकट्या मुलीला पाहून याच परिसरात राहणारे ज्ञानदीप कडमी आणि त्याच्या नराधम सहकाऱ्यांनी पिडीत मुलीला जेवायला देतो म्हणून मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. पुढेही त्यांनी अशीच बळजबरी केली आणि गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला.

घटना अशी आली समोर

याप्रकरणी काही दिवसांपूर्वी बालकल्याण समितीचे सदस्य, तत्वशिल कांबळे यांच्याकडे एक तक्रार आली होती.त्यामुळे कांबळे यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने घटनेची माहिती घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी पिडीत मुलीकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यादरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतरच या अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात 400 ते 500 नराधमांनी बलात्कार केल्याच स्पष्ट झाले.

तर याविषयी बोलतांना, बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे म्हणाले की, सहा महिन्यात पिडीत मुलीला माणुसकी दाखवणारा एकही माणूस भेटला नाही याची लाज वाटते. दररोज दोघांकडून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला जात होता. त्यामुळे या प्रकरणात सर्व आरोपीला अटक करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी बालकल्याण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी केली आहे.

पोलिसांकडून ही अत्याचार...

पिडीत मुलगी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची व्यथा घेऊन तीन वेळा पोलीस स्टेशनला गेली, मात्र पोलिसांनी तिच्या तक्रारारीची दखल घेतली नाही. एवढेच नाही तर लॉजवर पोलिसांनी पकडलं असता पोलिसांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या भुमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

अल्पवयीन पीडिता गरोदर

वडील आणि नवऱ्याकडून सुरु असलेल्या अत्याचाराला कंटाळून घर सोडणाऱ्या या पडीत मुलीने शहर गाठलं, मात्र त्या ठिकाणी सुद्धा अत्याचारांची मालिका सुरू राहिली. सहा महिन्यात दररोज दोघांनी बलात्कार केले.काहींनी तर सामूहिक बलात्कार केले. एवढंच नाही तर पाच हजाराला विकल असल्याची देखील माहिती समोर आलीय. तर अल्पवयीन पीडिता गरोदर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हुंड्यावरुन त्रास

बीड पोलीस अधीक्षक राजा रामासामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तर 8 महिन्यांपूर्वी पीडितेचं लग्न लावून देण्यात आलं होतं. मात्र सासरच्या मंडळींनी हुंड्यावरुन तिला त्रास द्यायला सुरुवात केली. पतीदेखील नेहमी तिला मारहाण करीत होता. यामुळे ती वडिलांच्या घरी निघून आली. मात्र वडिलांनी मुलीला घरात राहण्याची परवानगी दिली नाही. यानंतर ती अंबेजोगाई बस स्टँडवर भीक मागत होती. यानंतर तिच्यावर बलात्काराच्या घटना सुरू झाल्या.

आतापर्यंत १५ आरोपींची ओळख पटली

अंबाजोगाई येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात ४०० पेक्षा जास्त लोकांनी पिडीत मुलीवर अत्याचार केला आहे. यातील आतापर्यंत १५ आरोपींची ओळख पटवण्यात आली असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा सुद्धा पोलीस शोध घेत आहे.

बालकल्याण समितीची भूमिका...

तर याविषयी बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले की, बीड जिल्ह्यात महिन्यात 60 पोस्कोचे गुन्हे दाखल होत आहेत. अंबाजोगाई मधील प्रकार अत्यंत गंभीर असून अल्पवयीन पीडित मुलगी बालकल्याण समितीकडे आलेली आहे. तिची तपासणी केली असून ती 20 आठवड्याची गर्भवती आहे. तिच्यावर पाच ते सहा महिन्यांत पैशाचे, जेवणाचे अमिश दाखवून 400 ते 500 लोकांनी अत्याचार केलाय. यात 2 पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत, हे धक्कादायक आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे. मात्र सुज्ञ नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ अभय वणवे यांनी केले आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया...

तर याविषयी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आर. राजा स्वामी म्हणाले की, या प्रकरणांमध्ये आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून चार आरोपींना अटक केली आहे. बलात्कार आणि बालविवाहाच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून महिला पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच या प्रकरणांमध्ये जे कुणी आरोपी असतील त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच तपासात जर पोलिस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं, तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी सांगितलंय.

CBI चौकशीची मागणी

एक अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली असून ज्यात दोन पोलिसांचा सुद्धा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अजूनही त्या पोलिसांना अटक झाली नसून, ह्या घटनेचा स्थानिक पोलिसांकडून पारदर्शकपणे तपास होणार नाही. त्यामुळे हे प्रकरण CBI कडे सोपवले जावे आणि CBI च्या माध्यमातून या घटनेची चौकशी केली जावी अशी मागणी सामजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी केली आहे.


Updated : 26 Nov 2021 3:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top