Home > News Update > धक्कादायक : लग्नास नकार दिल्याने ऊसतोड कामगाराच्या मुलीला गुंडाने पाजले विष

धक्कादायक : लग्नास नकार दिल्याने ऊसतोड कामगाराच्या मुलीला गुंडाने पाजले विष

धक्कादायक : लग्नास नकार दिल्याने ऊसतोड कामगाराच्या मुलीला गुंडाने पाजले विष
X

"माझ्यासोबत लग्न कर" म्हणत ऊसतोड कामगाराच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला, गावातीलच नराधम गावगुंड तरुणाने विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत, त्या गावगुंड तरुणाच्या तावडीतून मुलीला सोडवत, तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना, बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात रात्री आठच्या दरम्यान घडली आहे.

नुकतीच दहावीची परीक्षा देणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी, आपले आई वडील ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेल्यानंतर, काकांकडे राहत होती. हीच संधी साधून गावातील एक 25 वर्षीय तरुण तिची छेड काढत असे. गेल्या दोन वर्षांपासून तो सतत तो छेड काढत होता आणि, आपल्यासोबत लग्न कर, असं म्हणत सतत धमक्या द्यायचा, शाळेत जाताना अडवायचा, असा आरोप पीडितेच्या कुटुबियांनी केला आहे. शेतातच राहणाऱ्या पीडितेच्या घरी रात्रीच्या वेळी तो गेला आणि आपल्यासोबत लग्न कर असं म्हणत त्याने तिला विष पाजलं असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पीडितेचा जबाब नोंदवला असला तरी अजूनही आरोपी फरार आहे.

" ऊसतोड कामगारांच्या मुलीला छेडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना नाही, या अगोदरही अनेक घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मुलीला देखील गावातील ब्लास्टिंग काम करणाऱ्या गावगुंड तरुणाकडून त्रास होता. त्याने मुलीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा नराधम तरुणांवर कडक करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंडित तुपे यांनी केली आहे,

Updated : 2 Jun 2022 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top