मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण

31

मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडीलांना भरचौकात झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात घडला आहे. भाळवणी गावातील एका मुलीने तिच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत पळून जाऊन लग्न केले.

यामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी चक्क मुलाच्या वडिलांना घरापासून ३ किलोमीटर अंतरापर्यंत दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले. एवढ्यावरच हे लोक थांबले नाहीत तर गावात भरचौकात लिंबाच्या झाडाला त्यांना बांधण्यात आले आणि तिथे त्यांना मारहाण करण्यात आली.

ही घटना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. पण या घटनेमुळे त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटात जमावबंदीचा आदेश असताना सामूहिकरीत्या मारहाण करण्यात आल्य़ाचे घटनेने खळबळ उडाली आहे.

Comments