Home > News Update > लिफ्टचे दोर तुटल्याने मोठी दुर्घटना घडली; चार व्यक्ती गंभीर जखमी

लिफ्टचे दोर तुटल्याने मोठी दुर्घटना घडली; चार व्यक्ती गंभीर जखमी

लिफ्टचे दोर तुटल्याने मोठी दुर्घटना घडली; चार व्यक्ती गंभीर जखमी
X

भिवंडी : भिवंडीमध्ये पाच मजली इमारतीतील लिफ्टचे दोर तुटल्याने मोठी दुर्घटना घडली. दोर तुटल्याने लिफ्ट चौथ्या मजल्या वरुन थेट तळमजल्यावर आदळली. भिवंडी शहरातील विठ्ठल नगर येथील ग्लोबल कॉम्प्लेक्स येथील क्लासिक या पाच मजली इमारतमध्ये ही दुर्घटना घडली. लिफ्ट कोसळल्याने लिफ्टमधील चार व्यक्ती जखमी झालेत.

ग्लोबल कॉम्प्लेक्समधील क्लासिक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आरिफा यांच्या घरी ग्यारव्हीची नियाज निमित्त भोजन कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांचे मित्र वसीम अन्सारी, निजाम शेख, जुबेर शेख हे आले होते. जेवण करुन रात्री पावणे दहा वाजता ते परत जाण्यासाठी निघाले. तेव्हा तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरल्यानंतर गेट बंद करण्यापूर्वीच लिफ्टची लोखंडी दोर तुटले.

लिफ्टचे लोखंडी दोर तुटल्याने लिफ्टचा संपूर्ण सांगाडा थेट 50 फूट खाली कोसळला. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असलेल्या तिन्ही व्यक्ती गंभीर जखमी झालेत. या दुर्घटनेत जुबेर शेख यांचा पाय फॅक्चर झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात तर दोघांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींचे जबाब नोंदवून घेतले. तसेच, पोलिसांनी इमारतीच्या बिल्डर विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Updated : 22 Nov 2021 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top