Home > News Update > व्हॅलेंटाईन डे निमित्त शहरात गुलाबाच्या फुलांची मोठी आवक....

व्हॅलेंटाईन डे निमित्त शहरात गुलाबाच्या फुलांची मोठी आवक....

आज 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त औरंगाबाद शहरात गुलाबाच्या फुलांची मोठी आवक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र गुलाबाच्या फुलाला गिऱ्हाईक मिळत नसल्यामुळे भाव गडगडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

व्हॅलेंटाईन डे निमित्त शहरात गुलाबाच्या फुलांची मोठी आवक....
X

आज प्रेमाचा दिवस म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' दोन वर्षांपूर्वी या दिवसाला फार महत्त्व होते कॉलेज महाविद्यालयांमुळे मुलींमध्ये गुलाबाचे फुल देऊन आपलं प्रेम जाहीर करण्याची पद्धत होती. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर तरुण-तरुणीने याकडे पाठ फिरवली आहे. ही प्रथा फार कमी झाली असून याचा परिणाम शेतकरी काढत असलेल्या गुलाबाच्या फुलाच्या पिकांवर झाला आहे. आज शहरांमध्ये पंधरा-सोळा टनच्यावर गुलाबाच्या फुलांची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र या गुलाबाच्या फुलांची आवक वाढल्याने याला कवडीमोल भाव मिळत आहे. 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी जे गुलाबाचे एक फुल ५० रुपयाला विक्री होत होते. मात्र आज गुलाब 30 रुपये प्रती किलो प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गुलाबाच्या फुलाची शहरात आवक जास्त झाली आणि मागणी कमी झाली यामुळे गुलाबाचे भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Updated : 14 Feb 2023 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top