Home > News Update > बीडमध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार...!

बीडमध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार...!

बीड शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

बीडमध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर 60 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार...!
X

बीड (beed) जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत सहा वर्षीय मुलीवर साठ वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नराधम आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि. ०२) शाळेतून गावाकडे घरी आल्यानंतर ती खेळण्यासाठी गेली. त्यानंतर रात्री ती कोणासही काहीही न बोलता एकटीच शांत बसली. त्यामुळे आई-वडिलांनी तिला विचारले असता पोट दुखत असल्याचे तिने सांगितले. दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यानंतरही तिचे पोट दुखत होते. त्यामुळे वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ती मैत्रिणीसोबत खेळत असताना विष्णू बाबुराव साटुळे (वय 60) हा तिथे आला. चल तुला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तो तिला जुन्या घरात घेऊन गेला. तिथे नराधम विष्णूने त्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास मारून टाकीन अशी धमकी दिली. सुरुवातीस मानहानी होण्याच्या भीतीने मुलीच्या आई वडिलांनी कोणालाच काही सांगितले नाही. मात्र, ग्रामस्थांनी धीर दिल्यानंतर त्यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी विरुद्ध पोक्सोसह कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई येथील एका शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

Updated : 6 March 2023 5:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top