चिंताजनक ! राज्यात गेल्या २४ तासांत ८७ नवे कोरोना रूग्ण
कृष्णा कोलापटे | 28 Dec 2023 7:40 AM GMT
X
X
Mumbai- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होतं आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८७ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज कोरोनाच्या JN 1 व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळला नाही. परंतु देशात JN 1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०० वर गेली आहे.
महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८७ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर १. ८१ टक्के आहे. राज्यात सध्या १९४ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील १६२ रुग्ण हे कॉरंटाईन मध्ये आहेत. तर ३२ रुग्ण रुग्णालयात आहेत. तर ७ रुग्ण हे आयसीयूमध्ये आहेत. २५ रुग्ण हे आयसीयूच्या बाहेर आहेत. नांदेडमध्ये दोन जणांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली. ते दोन्ही रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. दीड हजार तपासणीत दोघांना लक्षणे आढळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
Updated : 28 Dec 2023 7:40 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire