Home > News Update > ८३ वर्षाच्या आजीबाईंची कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी...एकेरीत कांस्यपदकावरही नाव कोरले....

८३ वर्षाच्या आजीबाईंची कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी...एकेरीत कांस्यपदकावरही नाव कोरले....

८३ वर्षाच्या आजीबाईंची कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामगिरी...एकेरीत कांस्यपदकावरही नाव कोरले....
X

कोणताही विक्रम करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी वयाची मर्यादा असूचं शकत नाही. आणि आपल्या इच्छेआड वय येवू नये. वय फक्त आकडा आहे. पण तेच खरं सत्य आहे. तुमच्याकडे चांगले कलागुण असतील तर यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं, हे सत्य आहे. असाच एक विक्रम घडलाय पुण्यामध्ये...पुण्यातील ८३ वर्षीच्या आजीबाईंनी कॅरम स्पर्धेत पदकांची लयलुट केली आहे. कॅरमच्या दुहेरी स्पर्धेत सुवर्ण तर एकेरीत कांस्यपदक जिंकून आजीबाईंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपल्या आजीला एवढं मोठं यश मिळालेलं पाहून नातू अक्षय मराठेने आपल्या आजीचा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवरून शेअर केला.

अक्षय मराठेने आपल्या आजीने कॅरमच्या दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यावर आजीचा एक फोटो आणि व्हिडीओ अक्षयने ट्टविटरवर पोस्ट शेअर केली. पुण्यात आयोजित केलेल्या ऑल मगरपट्टा सीटी कॅरम टूर्नामेंटमध्ये ८३ वर्षाच्या आजीने कॅरमच्या दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक आणि एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. कॅरम खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या एका तरुणीचा ८३ वर्षाच्या आजीने पराभव केला आहे. याचा मला अभिमान असल्याचे अक्षय मराठाने सांगितले आहे. आणि माझी आजी कॅरम या खेळामध्ये नव्याने पदार्पण करणाऱ्या खेळाडूंसाठी एक माईलस्टोन बनेल, अशी आशा व्यक्त केली.

अक्षयने आपल्या दुसऱ्या ट्टविटमध्ये अक्षय आणि त्याचे मित्र सुवर्णपदक विजेत्या आजीसोबत कॅरम खेळत आहेत. आजीच्या कॅरममधील कौशल्यासमोर अक्षयचे मित्र काही वेळ सुद्धा टिकू शकले नाहीत. अक्षयच्या या ट्विटनंतर आजीवर मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे आजीकडून प्रेरणा घेणारे सुद्धा यावेळी दिसून आले. मॅक्स महाराष्ट्रच्या टिमकडून सुवर्णपदक विजेत्या आजीना हार्दिक शुभेच्छा...

Updated : 12 Jan 2023 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top