मध्यप्रदेश भाजपाच्या ८० नेत्यांचे राजीनामे

भोपाळ: सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ मध्य प्रदेशातील भाजपच्या ८० नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले.

राजिक कुरेशी फर्शीवाला यांनी ही माहिती दिली. राजिक कुरेशी फर्शीवाला हे भाजपचे बडे नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जातात.

या संदर्भात त्यांनी पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र पाठवून राजीनामे दिले आहेत. CAA हा कायदा लागू केल्यानंतर समाजात वावरणे आम्हाला अवघड झाले आहे. या कायद्यात फुटीची बीजे आहेत, असे या नेत्यांनी म्हटलं आहे.