या 8 राज्यांमध्ये कोरोनाचे 85 टक्के रुग्ण
Max Maharashtra | 28 Jun 2020 7:15 AM IST
X
X
देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 5 लाखांच्यावर गेली आहे. पण या रुग्णसंख्येपैकी एक्टिव्ह असलेले तब्बल 85 टक्के रुग्ण हे फक्त 8 राज्यांमध्ये आढळले आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी कोरोना संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत ही माहिती सादर केली. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोनोच्या एक्टिव्ह रुग्णांची 85 टक्के आहे.
तर कोरोनामुळे मृत्यू झालेले 87 टक्के रुग्ण हे याच 8 राज्यांमधले आहेत. तर रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग आता 19 दिवसांवर पोहोचल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये आता केंद्रीय पथक पुन्हा पाहणी करत असून उपाययोजनांबाबत माहिती घेत आहे.
Updated : 28 Jun 2020 7:15 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire