बीड जिल्ह्यात मुंबई,ठाण्याहून आलेले 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

Courtesy: Social Media

कोरोनाच्या संकटामुळे सध्या अनेकजण शहरांमधून आपापल्या गावी परतत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमधून लोक गावाकडे जात आहेत. पण यातील काही जणांना तिकडे गेल्यानंतर कोरोना झाल्याचे प्रकार घडले आहेत. बीड जिल्ह्यातही असेच मुंबई, ठाण्यातून आलेले 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील 66 पैकी 55 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. तर इत तिघांचे अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिलीय. पॉझिटीव्ह आलेल्या 8 रुग्णांमध्ये केज तालुक्यातील केळगाव, चंदनसावरगाव आणि गेवराई तालुक्यातील इटकूर आणि बीड इथल्या रुग्णांचा समावेश आहे.

केज तालुक्यातील चंदनसावरगाव इथं पॉझिटिव्ह आढळलेला युवक मुंबईमधून विनापास आलेला होता. हा युवक कळंब इथं आल्यानंतर त्याला घ्यायला गावातील दोघे गेले होते. विशेष म्हणजे तो आल्यानंतर क्वारंटाईन झालेला नव्हता, अशी माहिती चंदनसावरगाव ग्रामस्थांनी दिली आहे. तर इटकूर इथं आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनामधून बरी झालेल्या मुलीची 35 वर्षीय आई पॉझिटीव्ह आढळून आली आहे. बीडमध्ये ठाण्यामधून आलेले दोघे आहे. त्याचे वय 22 आणि 44 आहे. तर 16, 14 आणि 36 वर्षांते तीन रुग्ण हे ठाण्यामधून आलेले आहेत. दरम्यान आष्टी तालुक्यातील आढळलेल्या 7 रुग्णांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर र्वरित 6 जणांना पुण्याला पाठवण्यात आले आहे.