Home > News Update > अहमदनगर शहरात 74 वर्षीय महिलेला मारहाण करून अत्याचार

अहमदनगर शहरात 74 वर्षीय महिलेला मारहाण करून अत्याचार

अहमदनगर शहरात 74 वर्षीय महिलेला मारहाण करून अत्याचार
X

अहमदनगर : अहमदनगर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरात एका 74 वर्षीय महिलेवर मारहाण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तारकपूर परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून काल मध्यरात्री एका नराधमाने हे कृत्य केलं आहे. ही महिला एका पत्र्याच्या घरात राहत होती. मध्यरात्री आरोपीने घरात घुसून महिलेला मारहाण केली. तिच्या चेहऱ्यावर काचेची बाटली फोडल्याचे प्रथदर्शनी दिसून येत असून , अतिशय क्रूर पध्दतीने मारहाण करत या महिलेवर अत्याचार करण्यात आला. दरम्यान पीडित महिलेला उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी महिलेच्या शेजारी राहणारे व्यक्ती पाणी देण्यात या महिलेच्या घरी गेले असता त्यांना ही महिला जखमी अवस्थेत घरात आढळून आली, दरम्यान त्यांनी तात्काळ शेजारील रहिवासांना माहिती देत, जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत , महिला जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Updated : 2021-11-12T16:16:01+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top