Russia vs Ukraine : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे ७० सैनिक ठार, भारतीयांना कीव शहर सोडण्याच्या सूचना
Xप्रातिनिधीक इमेज
रशिया आणि युक्रेनमधल्या युध्दाच्या सहाव्या दिवशी एकीकडे दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू आहे. तर दुसरीकडे रशियाला आपले आक्रमण आणखी तीव्र केले आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे ७० सैनिक ठार झाली आहे. खार्कीव्ह आण कीव शहरांच्यामध्ये असलेल्या ओखत्यिर्का या भागात हा हल्ला झाले आहे. यामध्ये युक्रेनच्या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवजवळ रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात जमू लागले आहे. त्यामुळे मंगळवारचा दिवस युक्रेनच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान गेल्या पाच दिवसात युक्रेनकडून रशियाच्या सैन्याला कडवा प्रतिकार करण्यात येतो आहे. त्यामुळे पुतीन यांच्या अपेक्षेपेक्षा युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याला बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. तर दुसरीकडे जगभरातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याने रशियामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. युरो आणि डॉलरच्या तुलनेत रशियाच्या चलनाची मोठी घसरण झाली आहे. पण खार्कीव्ह या युक्रेनमधील दुसऱ्या क्रमाकांच्या शहरात रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचे प्राण गेल्याचे वृत्तही काही माध्यमांनी दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही युक्रेनमध्ये १०२ नागरिक ठार झाल्याचे सांगितले आहे.
रशियन सैन्य कीवकडे वेगाने सरकत असल्याने आता युक्रेनमधील भारतीय दुतावासाने शहरातील भारतीयांना कीव शहर सोडण्याची सूचना केली आहे. भारतीय नागरिकांनी मंगळवारीच शहर सोडून जावे असे आवाहन केले आहे. तसेच ज्या ट्रेन उपलब्ध आहे त्याद्वारे किंवा जी वाहनं मिळतील त्याद्वारे शहर सोडण्याचा सल्ला भारतीय दुतावासाने दिला आहे.