Home > News Update > मोदींचे 'हे' इंडियन मॉडेल कोण स्वीकारणार? नवाब मलिक यांचा सवाल

मोदींचे 'हे' इंडियन मॉडेल कोण स्वीकारणार? नवाब मलिक यांचा सवाल

मोदींचे हे इंडियन मॉडेल कोण स्वीकारणार? नवाब मलिक यांचा सवाल
X

नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे... ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत... औषधांचा तुटवडा आहे... देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे हे इंडियन मॉडेल कोणीच स्वीकारणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलवर जोरदार टीका केली आहे.

येत्या २६ मेला केद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे.

इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देत आहे. असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

चांगली कामे करत राहिले पाहिजे. एखादं यश असेल किंवा काम झालं असेल तर निश्चितरुपाने लोकं प्रशंसा करतात पण अपयशी ठरुनही आम्ही चांगलं काम करतोय असं भाजप बोलत राहिला तर लोक स्वीकारणार नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

सात वर्षात नोटाबंदी झाली... जीएसटी लावण्यात आली... कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही... लोकांचे हाल झाले... बेरोजगारी वाढली... नोकर्‍या गेल्या... लोकं जीव गमावत आहेत... तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

Updated : 23 May 2021 8:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top