Home > Election 2020 > उद्धव ठाकरेंसोबत उद्या ६ मंत्र्यांचा शपथविधी; विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे

उद्धव ठाकरेंसोबत उद्या ६ मंत्र्यांचा शपथविधी; विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे

उद्धव ठाकरेंसोबत उद्या ६ मंत्र्यांचा शपथविधी; विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे
X

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. उद्या शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांचे प्रत्येकी २ मंत्री शपथ घेणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला ३ डिसेंबरआधी बहुमत चाचणी घेण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करून ३ डिसेंबरनंतर उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार आहे.

हे ही वाचा

मातोश्री मध्ये बसून कामं करणं खूप सोपं असतं – नितेश राणे

‘हे’ सरकार फक्त ५ वर्ष नाही तर, ५० वर्ष टिकेल – छगन भुजबळ

हे तेच अजित पवार आहेत का?

सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अडून बसले होते. मात्र, त्यावर आता तोडगा निघाला आहे. निधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असणार आहे तर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. याशिवाय उपमुख्यमंत्रीपदही राष्ट्रवादीकडे असणार आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमके कोण मंत्री शपथ घेणार याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

Updated : 27 Nov 2019 4:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top