Home > News Update > जळगाव जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

जळगाव जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

जळगाव जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट
X

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जळगावात एकच कोरोनाबाधीत रुग्ण होता. पण आता ल़ॉकडाऊच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या तबब्ल 621 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 68 झाली आहे. कोरोनाच्या फैलावाला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

यात आणखी भर म्हणजे नागरिक लॉकडाऊनमध्ये सर्रास नियमांची पायमल्ली करत दूध, भाजीपाला, किराणा,औषधांच्या बहाण्याने बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. जळगाव आणि भुसावळ या दोन शहरांमध्ये शंभरपेक्षा जास्त बाधीत रुग्ण आहेत. अमळनेर, भडगाव, पाचोरा, रावेर,चोपडा,यावल, एरंडोल या तालुक्यातील ग्रामीण भागांपर्यंत कोरोना पोहोचल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अशीच काहीशी परिस्थिती धुळे जिल्ह्याची आहे. धुळे जिल्ह्यात 133 रुग्ण कोरोना बाधीत आहेत, धुळे शहर हॉटस्पॉट बनला आहे, शिरपूरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच पुन्हा डोकं वर काढलं आहे. 32 रुग्णांपैकी 19 जण बरे झाले आहेत, तर सध्या 10 जणांवर उपचार सुरू असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 30 May 2020 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top