6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण…

कोरोना विषाणूचा संसर्ग गोंदिया जिल्ह्यात आता लहान बालकांना सुद्धा होऊ लागला आहे.आज 30 जून रोजी 6 महिन्याच्या बालिकेला आणि अन्य दोघा जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचा अहवाल गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.

दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने विशेषतः लहान बालक संसर्ग बाधित आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.आज आढळून आलेले तीनही रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे.उर्वरित दोन रुग्ण 20 ते 40 वर्षे वयोगटातील आहे.आतापर्यंत बाधित रुग्णाची संख्या 125 झाली आहे.

गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 321 अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 24 क्रियाशील रुग्ण आहे

गोंदियाच्या प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2993 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्यामध्ये 125 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.तर 321 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 338 आणि घरी 1367 अशा एकूण 1705 व्यक्ती विलगीकरणात आहे.

जिल्ह्यात क्रियाशील कंटेंनमेंट झोन अकरा असून यामध्ये गोंदिया तालुका – मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव,पारडीबांध कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका – पाऊलदौना व पाथरी,तिरोडा तालुका -तिरोडा (सुभाष वार्ड) आणि सडक/अर्जुनी तालुका -राका आणि सौंदडचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here