Home > News Update > 70 लाख रुपये किंमतीचे चोरीचे मोबाईल जप्त ; 2आरोपी गजाआड

70 लाख रुपये किंमतीचे चोरीचे मोबाईल जप्त ; 2आरोपी गजाआड

70 लाख रुपये किंमतीचे चोरीचे मोबाईल जप्त ; 2आरोपी गजाआड
X

मुंबई : मुंबई पोलिसांच्या घाटकोपर गुन्हे शाखा 7 ने धडक कारवाही करत कर्नाटक राज्यातून चोरी करून आणलेले 500 मोबाईल जप्त केले आहेत. ज्याची किंमत जवळपास 70 लाख रुपये आहे. गुन्हे शाखा युनिट 7 ला आपल्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका टेम्पोमध्ये चोरीचे रेड मी कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घाटकोपरच्या गारोडीया नगरमध्ये सापळा लावला टेम्पो आल्यावर त्याची पाहणी केली असता त्यात 25 बॉक्समध्ये रेड मी कंपनीचे 495 मोबाईल आढळून आले. या मोबाईलचे बिल कागदपत्रे मागितली असता संबंधित आरोपींनी दिली नाही, दरम्यान त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात मूलबागर कोलार हायवे वर या मोबाईलचा कंटेनर गेल्या महिन्यात लुटण्यात आला होता. त्यातील हे मोबाईल असल्याची माहीती आरोपी रितेश ओमप्रकाश कसेरा आणि विजय राजेंद्र शेट्टी यांनी दिली.

या दोन्ही आरोपींना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. हे आरोपी 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल साडे सात हजारात विकणार होते. पण त्यापूर्वीच आरोपींना पोलिसांनी अटक केली आली.

Updated : 15 Sep 2021 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top