चिंताजनक- पुणे शहरातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव

580

पुणे शहराभोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. शहरातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीमध्ये अखेर कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. इथं कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून तातडीने उपयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या वसाहतीतील एक 70 वर्षीय वृद्ध विविध आजारांनी ग्रस्त असल्यामुळे त्यांना आठवड्यातून दोनदा डायलिसिससाठी जावे लागत होते. तेव्हाच त्या वृद्धाला या विषाणूची बाधा झाली आणि तातडीने त्यांच्या संपर्कात असलेल्या चार जणांची तपासणी करण्यात आली. त्या चौघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या पाचही जणांना इथल्या एका शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत इतर 15 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्यांचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत.