गडचिरोलीमध्ये 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान, शस्त्रसाठा जप्त
सागर गोतपागर | 29 March 2021 9:03 PM IST
X
X
गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाला पाच नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. या कारवाईमध्ये तीन पुरुष तर दोन महिला नक्षलवादी ठार झाले आहेत. खोब्रा मेंढा जंगल परीसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राबवलेल्या नक्षल विरोधी अभियानात जवानांना हे यश मिळाले आहे.
गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवले गेले. यावेळी पोलीस आणि नक्षल यांच्यात चकमक झाली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. काडतुसे, मॅगझिन, 3 प्रेशर बॉम्ब, सुतळी बॉम्ब,सोलर प्लेट, औषध साठा, वायर बंडल यांचा जप्त करण्यात आलेल्या साहित्यात समावेश आहे.
Updated : 29 March 2021 9:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






