Home > News Update > शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात, 5 जण जागीच ठार

शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात, 5 जण जागीच ठार

शेगावला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात,  5 जण जागीच ठार
X

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दर्शनासाठी येत निघालेल्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. एकादशी असल्याने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रोहनवाडी येथील 12 भाविक आपल्या बोलेरो कारने शेगावला दर्शनासाठी निघाले होते.



खामगाव - जालना महामार्गावर देऊळगाव राजा बायपास रडवर समोरून येणाऱ्या ट्रकने भाविकांच्या बोलेरो कारला समोरासमोर जबर धडक दिली. या धडकेच बोलेरो कारमधील 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींवर देऊळगाव राजा व जालना जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये बोलेरो चालक, 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. याच मार्गावर गेल्या दोन महिन्यातील हा असे चार अपघात झाले आहेत.

Updated : 14 March 2022 3:45 AM GMT
Next Story
Share it
Top