Home > News Update > दिल्लीतील अनाज मंडी येथे भीषण आग; 43जणांचा मृत्यू

दिल्लीतील अनाज मंडी येथे भीषण आग; 43जणांचा मृत्यू

दिल्लीतील अनाज मंडी येथे भीषण आग; 43जणांचा मृत्यू
X

दिल्लीमधील (delhi) अनाज मंडी परीसरातील तीन मजली कारखान्याला आज सकाळी पहाटे भीषण आग लागली. या आगीत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राणी झांशी रोडजवळील अनाज मंडीतील कारखान्याच्या वरच्या मजल्यावर सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीतील गंभीर जखमींना सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण आगीमधून अनेकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

हे ही वाचा...

जेव्हा बलात्कार पिडीतेचेच एनकाऊंटर केले जाते – प्रा. हरी नरके

राज्यात खरंच फडणवीसांच्या विरोधात एक गट सक्रीय झालाय का?

संघाच्या संस्थांची मदत उद्धव ठाकरेंनी थांबवली !

घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळावर होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. केजरीवाल यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की, “ही घटना वेदनादायी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची नुकसान भरपाई देण्यात येईल, तर जखमींना एक लाख रूपये भरपाई देण्यात येईल. त्याचबरोबर जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार देईल,” अशी माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली आहे.

Updated : 8 Dec 2019 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top